शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देऊळगाव राजात कापसाला मिळाला हंगामातील उच्चांकी भाव सभापती समाधान शिंगणे यांची शेतकऱ्यांप्रति धडपड यशस्वी

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी 

कापसाच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यापासून कापसाचे भाव वधारले आहेत. विदर्भातील कापसाची पंढरी म्हणून ओळख असणाऱ्या देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. २० मार्च रोजी कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ८०० रुपये इतका दर मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आता कापूस विक्रीवर भर दिला आहे.दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०२१-२२ मध्ये कापसाला १० ते १२ हजारांपर्यंत भाव मिळाला होता. यंदाही कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले. उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरले. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाही कापसाच्या दरात लक्षणीय घट झाली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे केंद्र सरकारने कापसाची किमान आधारभूत किंमत ७ हजार ५०० च्या जवळपास निश्चित केली.या एमएसपीवर शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे. एवढ्या रकमेवर कापसाचा खर्चही व्यवस्थित निघत नाही. किमान कापसाला १० ते १२ हजार रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, असा सूर शेतकऱ्यांमधून निघत आहेत. दरम्यान, उशीरा का होईना.पण आता कापसाचे दर वाढले आहेत. कापसाला प्रतिक्विंटल साडेसात हजारांपेक्षा अधिक भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर मिळावा, शेतकऱ्यांना जास्त त्रास होऊ नये, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयी, सुविधा पुरविण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांच्या माध्यमातून करण्यात आला. यावर्षी जवळपास पाच लाख क्विंटल अधिक कापसाची खरेदी झाली आहे.

0 9 5 2 8 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *