मासरूळ:-विशेष प्रतिनिधी
येथे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत १०० दिवस कृती आराखडातंर्गत नागरिकांच्या समस्या सुकर होण्यासाठी म्हणून सामाजिक दातृत्व कार्यक्रमांतर्ग पीएम किसान योजना, जिवंत सातबारा, पांदण रस्ते खुले करणे, संयोगा डीबीटी व श्रावण बाळ तसेच संजय गांधी निराधार योजना अशा विविध विषयावर २० मार्च रोजी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भेट दौरा आयोजित करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निरासन व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विषयी मार्गदर्शन करण्यात आले.प्रारंभी उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी अंगणवाडी, जिल्हा परिषद मराठी शाळा व ग्रामपंचायत कार्यालय येथे भेट देऊन गावातील सर्व सुरू असलेल्या योजना विषयी माहिती घेतली. कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी पायघन, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच मधुकर महाले, ग्रामविकास अधिकारी दहिभाते व प्रतिष्ठित नागरिक मा. सरपंच जुलालराव देशमुख, पत्रकार संजय देशमुख, किरण देशमुख व सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद मराठी शाळेचे शिक्षकवृंद, शेतकरी बांधव तसेच श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे लाभधारक, ग्रामपंचायत कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काही समस्या असल्यास तलाठी शहागडकर यांच्याकडे देण्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन किरण उगले यांनी केले.
Users Today : 13