माळेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह

Khozmaster
2 Min Read

दाताळा:-विशेष प्रतिनिधी

मोताळा तालुक्यातील माळेगाव येथे धर्माळ संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे संगीतमय रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताह २० मार्च गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे.
सदर सप्ताहामध्ये दैनंदिन कार्यक्रमात सकाळी पाच ते सहा काकडा आरती, सकाळी सहा ते सात विष्णुसहस्त्रनाम, सकाळी नऊ ते बारा वाजता रामायण कथा, दुपारी दोन ते पाच वाजता रामायण कथा, सायंकाळी सहा ते सात वाजता हरिपाठ व रात्री आठ ते नऊ वाजता हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रास्ताविक कीर्तन हभप विजय महाराज भंगाळे यांच्या कीर्तनाने सुरुवात करण्यात आली.तर संगीतमय रामायण कथा प्रवक्ता हभप संतोष महाराज टिकार यांच्या सुमधुर वाणीतून कथेचे वाचन होणार आहे. संगीतमय रामायण कथा व अखंड सप्ताहासाठी विविध कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणार आहेत. त्यात २१ मार्च रोजी हभप गजानन महाराज मांडवेकर, २२ मार्च रोजी समाधान महाराज निमखेड, २३ मार्च रोजी हभप हेमंत महाराज जळगाव, २४ मार्च रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज धारशेरी, २५ मार्च रोजी हभप परमेश्वर महाराज लोणवाडी, २६ मार्च रोजी हभप अतुल महाराज बेटावदकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे २६ मार्च रोजी दुपारी पाच ते सात वाजता दिंडी सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. २७मार्च रोजी हभप संतोष महाराज टिकार शेगाव यांचे काल्याचे कीर्तन राहील व महाप्रसाद २७ मार्च रोजी दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत राहील. या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील माळेगाव, निपाणा, हरणखेड, वडजी नागेश्वर, दहिगाव वडजी, हरणखेडे, खानदेश, चिंचखेड प्रगणे येथील भजनी मंडळींनी सहभागी होऊन धार्मिक कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 9 5 2 8 7
Users Today : 13
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *