बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२४ या सत्रातील गायन, वादन व नृत्य या विषयांचा निकाल नुकताच घोषित झाला असून यामध्ये स्वरविहार संगीत विद्यालयाची विद्यार्थीनी तृषा टारपे हि शास्त्रीय गायन विषयात प्रवेशिका पूर्ण परीक्षेत प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे. सदर परीक्षा तृषा टारपे हिने केंद्र क्रमांक ४७८ अंध विद्यालय बोधडी, जिल्हा नांदेड येथून उत्तीर्ण केली. तृषा सध्या बुलढाणा येथे बीएएमएसचे वैधकीय शिक्षण घेत असून एक दमदार व मधुर आवाजाची गायिका म्हणून सुपरिचित आहे. सध्या ती स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये नियमित शास्त्रीय गायनाचे धडे घेत आहे. या परीक्षेसाठी तिला स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा. रविकिरण मोरे यांनी मार्गदर्शन केले आहे.
Users Today : 13