सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी
परिसरातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवनी आरमाळ येथील कैलास नागरे यांनी शेतीच्या पाण्यासाठी आत्महत्या केली. या गोष्टीचे राजकारण न करता, राजकीय पक्षांनी पोकळ आश्वासने न देता, ठोस उपाययोजना करायला हव्यात. स्व. कैलास नागरे यांच्या परिवाराला न्याय मिळेपर्यंत त्यांच्या परिवारासोबत राहणार असल्याचे प्रतिपादन छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी केले आहे.याबाबत अशोक जाधव पुढे म्हणाले की, नागरे परिवाराच्या मागण्या योग्य असून स्व. कैलास नागरे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत समाविष्ट करण्यात यावे, त्यांच्या मुलांचे सरकारने पालकत्व स्वीकारावे तसेच प्रत्येक मुलांच्या खात्यात ५० लाख रुपये टाकण्यात यावे, या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच अखिल भारतीय छावा संघटना नागरे परिवाराच्या मागण्या शासन दरबारी आक्रमक पद्धतीने मांडणार असून न्याय मिळेपर्यंत त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी असणार असल्याचे सांगितले. यावेळी अखिल भारतीय छावा संघटना बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव टेक, कार्याध्यक्ष कृष्णा कोल्हे, सिंदखेड राजा विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रसिद्धी प्रमुख रफीक सैय्यद, गजानन पुरंदरे आदी उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने स्व. कैलास नागरे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
Users Today : 13