दाभा:-विशेष प्रतिनिधी
शंभर दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत दाभा येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेतकऱ्यांच्या जमिनींच्या मालकी हक्काच्या नोंदी अद्ययावत करण्यासाठी लोणार तालुक्यात दाभा येथे ‘जिवंत सातबारा’ व सातबारा चावडी वाचन १० मार्च २०२५रोजी करण्यात आले होते.यावेळभ अॅग्रिस्टेक योजनेंतर्गत शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करून वाटप करण्यात आले. गावातील शेताला जोडणाऱ्या पांदण रस्ता, जमिनीचे पोट खराब क्षेत्र दुरुस्ती, गावातील विविध योजनेअंतर्ग लाभधारक यांना डीबीटी प्रणालीद्वारे केवायसी, राशन कार्ड केवायसी, मयत खातेदार याचे वारस लावून सातबारा जिवंत जिवंत मोहिमेची अंमलबजाणी, अतीक्रमनीत पांदन रस्ते, शिवार रस्ते, नकाशावरील रस्ते, लोक सहभागातून मोकळे करणे, पोट खराब जमिनीचे लागवडीखाली आणण्याचे प्रस्ताव आपल्यास्तरावर तयार करुन सादर करणे, मय्यत खातेदाराची यादी तयार करुन व्यापक स्वरुपात मोहीम राबऊन वरसाची नोंदची प्रक्रिया सहमतीने करुन घेणे, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजने मधील ज्या लाभार्थीचे डीबीटी अंतर्गत आधारकार्ड व बँक खाते, अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत स्थानीक सिएसी सेंटर, महाई सेवा केंद्र यांना भेटी देऊन फारमर आयडी तयार करणेजमा करणे, रेशन कार्ड ईकेवायसी करणे व मोबाईल सिडींग करणे, अशा स्वरूपाची माहिती ग्रामस्थांना हिरडव महसूल मंडळाचे मंडळ अधिकारी व्हि. डी. केंद्रे यांनी दिली.यावेळी दाभा ग्राम महसूल अधिकारी दिगंबर गावंडे, सरपंच मारोती मोरे, ग्रामपंचायत अधिकारी तांगडे, बबन बाजड, नामदेव बोखरे, महसूल सेवक शालिक बाजड, अमोल मोरे, विश्वास प्रधान, प्रकाश डव्हळे, गोविंद मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 13