देऊळगावस मही:-तालुका प्रतिनिधी
स्थानिक अहिल्याबाई होळकर मंगल कार्यालय येथील सभागृहामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या ३३२ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल गुरव मल्हारराव होळकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना म्हणाले की, मूळ महाराष्ट्रातील क्षत्रिय धनगर समाजातील असून भरत वर्ष सम्राट छत्रपती शाहू महाराजांच्या मराठा साम्राज्याचा माळवा (मध्य प्रदेश) प्रांताचे पहिले सुभेदार होते. छत्रपती शाहू महाराजांनी थोरले बाजीराव पेशवे यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये सहभाग असल्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी इंदोर संस्थानाची जहागिरी महाल केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रकाश वीर, अशोक शिंगणे, गणेश शिंगणे, भगवान जोशी, गणेश शेळके, पवन पन्नासे, उद्धव बकाल, बालू बनसोडे, दीपक गुरव, सागर जोशी, विठ्ठल गुरव, सतीश पंडित, अभिषेक गुरव, अभिषेक मैद, सोनू पंडित, नारायण चाळगे, सचिन बनसोडे, रमेश पंडित, आदित्य चोपडे, गणेश बकाल यांच्यासह जय मल्हार मित्र मंडळ व सामाजिक बांधव उपस्थित होते.
Users Today : 16