विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेत बुरुंगले इंग्लिश स्कूलचे यश

Khozmaster
1 Min Read

शेगाव:-तालुका प्रतिनिधी 

येथील स्व. उमाकांत मस्कुजी बुरुंगले इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वरवट रोड शेगावच्या इयता १२ वी तसेच इयत्ता १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागील सात वर्षापासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी विज्ञान ऑलिम्पियाड परीक्षेमधे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घव-घवित यश संपादीत केले आहे.
यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ९ वीच्या श्रेयश शामकुमार बुरुंगले, शाम विठ्ठल भटकर या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केले असून वेदांत शामकुमार बुरुंगले, सात्विक रामविजय बुरुगले, ऋषि शशिकांत बुरुंगले, रोशनी बर्डे, सोहम रवी माने, प्रगती चौखंडे, यश उन्हाळे, कृष्णा घुले, हरीश वाजपे, राजेश्वरी टकले, कोमल जाविर, खुशी बर्डे यांनी घवघवित यश प्राप्त केले आहे. त्यांना संस्थाध्यक्ष शिवाजीराव उमाकांत बुरुंगले, संस्था सचिव डॉ. शामकुमार उमाकांत बुरुंगले तसेच इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य डॉ. निलम कासलीवाल यांनी मार्गदर्शन केले.

0 9 5 2 9 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *