लोणारमध्ये खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात

Khozmaster
1 Min Read

लोणार:-तालुका प्रतिनिधी 

तालुक्यातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावी म्हणून महिला दिनाचे औचित्य साधून हिरकणी महिला मंचच्या वतीने संभाजीनगर येथील वाह होम मिनिस्टर फेम नितीन दीक्षित यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम १८ मार्च रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे उद्घाटन इंदुताई मापारी यांच्या हस्ते पार पडले. शहरासह तालुक्यातील महिलांना चूल, मूल व घर-प्रपंच संभाळत असताना त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा, तालुक्यातील महिलांचा एकमेकांशी परिचय व्हावा, या उद्देशाने हिरकणी महिला मंचच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील नितीन दीक्षित यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला. महिलांनी सहभाग घेत उखाणे घेणे, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, फॅशन शो, प्रश्नमंजुषा, गरबा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरकणी महिला मंचच्या सुनिता मापारी, अर्चना मापारी, अंजली इंगळे, कविता मापारी, स्वाती मापारी, समृद्धी मापारी, शितल जाधव, रेणुका खोत, सुप्रिया मापारी, राखी अग्रोया, साधना पोफळे, वर्षा मापारी, सपना मापारी, प्रियंका बनमेरू, प्रीती संचेती, स्वाती मापारी, लता ठाकूर, चांगुणा चव्हाण, स्वाती मापारी, जयश्री गायकवाड, सुरेखा बेदमुथा यांनी परिश्रम घेतले. प्रथम बक्षीस कल्याणी जाधव, द्वितीय नमिता खिवसरा तर तृतीय बक्षीस रूपाली मापारी यांनी पटकाविले. इतर विजेता महिलांना नेकलेस सेट, डिनर सेट, चांदीचे नाणे व इतर घरगुती वापराच्या वस्तू देण्यात आल्या.

0 9 5 2 9 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *