चिखलीत ५ हजार मुलांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श उपक्रम

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

चिखली मतदारसंघात आ. श्वेताताई महाले यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्य संवाद सेवा पंधरवडा’ या आरोग्यसेवेच्या वटवृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या पंधरवड्यात तब्बल ५ हजार मुलांच्या आरोग्य तपासणीचा संकल्प करण्यात आला असून आतापर्यंत १ हजार ७०० मुलांची तपासणी पूर्ण झाली आहे.आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणराज्य फाउंडेशन आणि आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांच्या प्रेरणेने हा उपक्रम अधिक यशस्वी होत आहे. आ. श्वेताताई महाले यांनी चिखली मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतलेलाच आहे. परंतु, त्यासोबतच मतदारसंघातील बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या आरोग्याची मानतात. त्यांच्या याच ध्यासातून या ‘आरोग्य संवाद सेवा पंधरवड्या’ ची संकल्पना साकारली आहे. या पंधरवड्यात २७ मार्च रोजी आयोजित वाढदिवसाच्या निमित्ताने आतापर्यंत मतदारसंघातील १० गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १७०० मुलांची तपासणी पूर्ण झाली आहे. ‘सेवा पंधरवडा’मध्ये ३० गावांमधील ५ हजार मुलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

0 9 5 2 9 0
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *