साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी
येथील सरपंच सुमन जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा ११ मार्च रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला होता. १८ मार्च रोजी त्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी सर्वानुमते अनुमती दिली. सरपंच पदाची निवडणूक होईस्तोवर सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच सय्यद रफीक सय्यद अक्रम यांच्याकडे सपुर्द करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस, भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवित ग्रामपंचातीवर बहुमत मिळविले होते. प्रथम सरपंच होण्याचा मान दाऊद कुरेशी यांना मिळाला. त्यांनी दिडवर्ष कारभार केला. त्यानंतर सुमन.
Users Today : 16