मानोरा:-तालुका प्रतिनिधी
तालुका विज्युक्टा कार्यकारणीच्यावतीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, प्रचलीत अनुदान सुत्रानुसार अनुदान देण्यात यावे, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात यावा, किंबहूना नवीन पद्धतीद्वारे देऊ केलेल्या एनपीएस धारकांना जाचक अटीतून मुक्त करावे, सरसकट निवड श्रेणी देण्यात यावी, १०, २०, ३० या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा, केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन अकरावीचे प्रवेश सरसकट बंद करावेत, तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, शिक्षण मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून, मीटिंग लावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात यावे, सांसदीय व संविधान पद्धतीचा वापर करण्यात यावा. आदी मागण्यांकरिता तहसीलदार मानोरा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मानोरा तालुका विज्युक्टा अध्यक्ष प्रा. विवेक डबले, जिल्हा कार्यकारी सदस्य प्रा. अनिल वाघमारे, प्रा. संजय हांडे, प्रा.दिलीप वानखडे, प्रा.विलास गांजरे, प्रा. सुनिल काळे, प्रा. पंकज राऊत, प्रा. समंती दयार्पूरकर, प्रा.विजय भगत, प्रा. ढोले, प्रा. भलावी, प्रा. आशीष, सचिन सोनोने आदी उपस्थित होते.
Users Today : 17