स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

Khozmaster
1 Min Read

रिसोड:-तालुका प्रतिनिधी

भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालय मध्ये मोफत स्पर्धा परीक्षा, पार्लर, फॅशन डिझाईन, बेकरी मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन १८ मार्च रोजी करण्यात आले.भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे मोफत प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य मंजुषा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक सिताराम फुके होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा. गुलाब एस. साबळे यांनी हा प्रशिक्षण घेण्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख अतिथी म्हणून मेजर रामदास फुके माजी सैनिक यांनी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संपूर्ण मैदानी तयारी करून घेण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रा.पी.एच. मोरे, प्रा. एस. ओ. चोमवाल, प्रा.जी.बी. वाझुळकर, प्रा. अभिषेक तिकाईत, प्रा. पंजाब पानझाडे, प्रा. दीपिका पुंड, प्रा. विजया कोटकर, प्रा. साधना बोरकर, प्रा. विजयमाला आसणकर, पायघन यांच्यासह शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गुलाब साबळे यांनी केले. तर, प्रा. अभिषेक यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *