वाशीम चंग महोत्सवाची सांगता

Khozmaster
1 Min Read

वाशीम:-तालुका प्रतिनिधी

राजस्थानी समाजाची संस्कृती व परंपपरेचे जतन करणाऱ्या वाशीम चंग महोत्सवाची सांगता परसुराम भवन ते बालाजी मंदिरापर्यंत मिरवणूक काढून करण्यात आली. वाशीम शहरात दरवर्षीप्रमाणे वाशीम चंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. २६ पेब्रुवारीपासून काटीवेश हनुमान येथे या महोत्सवाची सुरूवात करण्यात आली होती. तद्नंतर २७फेब्रुवारी रोजी श्री रामदेवबाबा मंदिर काटीवेश, २८ फेब्रुवारी रोजी हनुमान मंदिर माहूरवेश, १ मार्च रोजी सप्तेश्वर महादेव, २ व ३ मार्च जंगलेश्वर महादेव, ४ मार्च रोजी श्री लक्ष्मीनारायण मंदिर, ५ मार्च रोजी श्री राधाकृष्ण मठ काटीवेश, ६ मार्च रोजी चामुंडादेवी, ७ मार्च रोजी पवन डावर यांच्या निवासस्थानी, ८ मार्च रोजी आशिष हुरकट यांच्या निवासस्थानी, ९ मार्च रोजी दिनेश वर्मा, १० मार्च रोजी श्री बालाजी मंदिर, ११ मार्च रोजी श्री महेश भवन, १२ मार्च रोजी श्री परशुराम भवन, १३ मार्च रोजी संदीप बाहेती यांच्याकडे या चंग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी समाजातील युवावर्ग मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होत पारंपारिक गीत सादर करून नृत्याचा आनंद घेतला.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *