रिठद येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जलतारा योजनेचा शुभारंभ

Khozmaster
3 Min Read

रिसोड:-तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील रिठद येथे जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्याहस्ते महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा क्रमांक १ येथे येऊन जलतारा योजनेचा जनजागृतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावामधून रॅली काढून सुरुवात करण्यात आली. या रॅलीला जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. नंतर गावातील संत सभागृहात जलतारा योजना राबवण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस.यांचा सरपंच सौ. पंचफुला अंभोरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. तर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर यांचे स्वागत ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी केले. मार्गदर्शन करताना जलतारा योजने संदर्भात अल्पभूधारक व जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी सुद्धा सहभागी व्हावे व आपल्या परिसराचा, आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी जलतारा ही योजना राबवणे गरजेचे आहे. असे आवाहन त्यांनी केले. यानंतर पाणी फाउंडेशनचे सुभाष नानोटे यांनी जलतारा योजनेबद्दल विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी यांनी रिठद गावच्या परिसरातील माहिती घेऊन रिठद गावात चिया या पिकाची लागवड सर्वात जास्त होत आहे, त्याबाबत आनंद व्यक्त केला. जलतारा योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त जमिनीत पाणी पुरवण्यासाठी सामुहिक प्रयत्न केले तर दुष्काळ पडणार नाही. आणि आपल्याला बारा महिने पाणी पुरेल अशी व्यवस्था तुम्हालाच करायची आहे. पुढची पिढी सुद्धा पाण्यावाचून त्रस्त होणार नाही. उष्णतामानही वाढणार नाही. ही दखल घेणे गरजेचे आहे. ही योजना राबविली तर, गाव पाणीदार होईल व बाराही महिने शेती पिकवण्यासाठी या पाण्याचा उपयोग होईल. अशी प्रकारची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. यावेळी नारायण आरू यांनी रिठद गावालगत नदी असून या नदीतील पाण्याची भुगर्भात वाढ होण्यासाठी नदीचे खोलीकरणाची आवश्यकता आसल्याचे सांगीतले. त्यासाठी आपल्या नियोजन मधून मान्यता द्यावी, अशी मागणी केली. रामभाऊ बोरकर यांनी आपले विचार व्यक्त करताना जलतारा योजना शेतकऱ्यांच्या नाहीतर मानव जीवनाच्या आयुष्याला साथ देणारी व जीवन जगवणारी जलतारा आहे. यावेळी रिसोड तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी, जवादे, गटविकास अधिकारी लहाने, मंडळ अधिकारी पडवे, तलाठी रूपाली संत्रे, ग्रामविस्तार अधिकारी मोहन भुसारी, सरपंच पंचफुला अंभोरे, विठ्ठल आरु, गजानन आरु, धनंजय बोरकर, राजू आरु, विठोबा आरु, उमेश बोरकर, ज्ञानबा बोरकर, रवी आरु, गजानन बोरकर, संदीप आरु, मनोज इंगळे, शारदा आरु, तिलोत्तमा बोरकर इत्यादी महिला पुरुष शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषी सहायक अनिल इंगोले यांनी केले. तर, सुभाषराव बोरकर यांनी आभार मानले.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *