गावाच्या विकासासाठी प्रशासन थेट जनतेत !

Khozmaster
1 Min Read

मासरूळ:-विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत मासरूळ येथे २० मार्च रोजी विशेष गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी प्रत्यक्ष गावात येऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्वरित निराकरणासाठी आवश्यक सूचना दिल्या.यावेळी पीएम किसान योजना, जिवंत सातबारा, पांदण रस्ते खुले करणे, संयोगा डीबीटी, श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांसारख्या विविध योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. गाव भेट दौऱ्यात मंडळ अधिकारी पायघन, सरपंच मधुकर महाले, ग्रामविकास अधिकारी दहिभाते, माजी सरपंच जुलालराव देशमुख, पत्रकार संजय देशमुख व किरण देशमुख, तसेच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शेतकरी बांधव आणि शासकीय योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन किरण उगले यांनी केले. होते.दौऱ्यादरम्यान अंगणवाडी केंद्र, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन प्रशासनाने गावातील योजनांबाबत माहिती घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जमिनीशी संबंधित नोंदी तत्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. गावातील पांदण रस्ते खुले करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. वृद्ध आणि अपंग नागरिकांना शासकीय योजनांचा लाभमिळावा यासाठी प्रयत्नशील राहण्याचे
आश्वासन दिले. नागरिकांना आपल्या अडचणी तलाठी शहागडकर यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

0 9 5 2 9 1
Users Today : 17
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *