‘स्वाभिमानी’च्या प्रशांत डिक्करांनी प्रकल्पबाधितांकडून उकळली पाच लाखांची खंडणी

Khozmaster
3 Min Read

शेगाव:-तालुका प्रतिनिधी

जिगाव प्रकल्पासाठी संपादित केलेल्या शेतजमिनीचा जास्तीचा मोबदला मिळवून देतो म्हणत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून पाच लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. आणखी प्रकल्पग्रस्तांकडून धमक्या देत पैसे लुटण्यासाठी दबाव आणल्या जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी डिक्कर यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आल्याने डिक्कर बचावले. २१ मार्चला दुपारी एकच्या सुमारास शेगावात हा प्रकार घडला. शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांचीच आर्थिक लूट करण्यासाठी उपयोग केला जात असल्याने प्रशांत डिक्कर यांच्याविरोधात जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या जिगाव या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित केली आहे. त्यासाठी त्यांना मोबदला देण्यात येतो. मात्र, दिला जाणारा मोबदला प्रतिहेक्टर ४० लाख रुपयांनुसार मिळवून देतो, असे आमिष स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दाखविले. २१ मार्च रोजी शेगाव येथील जिगाव प्रकल्पांतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर आले होते. डिक्कर यांच्याकडून खंडणी मागितली जात असल्याने शेतकरी संतप्त झाले. या बैठकीतून शेतकऱ्यांनी धक्काबुक्की करीत डिक्कर यांना हाकलून लावण्यात आले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. प्रशांत डिक्कर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या डिक्कर यांना मारहाण झाली असती,शेतकऱ्यांच्या वतीने संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळच्या सरपंच पुष्पा संदीप मोरखडे यांनी शेगाव शहर पोलिसांत तक्रार नोंदविली. खंडणीप्रकरणात डिक्कर यांना विविध कलमान्वये गुन्हे नोंदवून अटक करण्यात आली.शेतकरी नेते प्रशांत डेक्कर हे शेतकऱ्यांनाच ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करीत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केली.

फिर्यादी सरपंचांनी काय म्हटले तक्रारीत?

संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ येथील सरपंच पुष्या संदीप मोरखडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्यानुसार, हिंगणा कवठळ शिवारातील गट नंबर ७७ मध्ये आमची तीन हेक्टर शेती आहे. या शेतीची जिगाव प्रकल्पांतर्गत इटखेड नवीन गावठान पुनर्वसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हस्तांतरण व मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, संग्रामपुर तालुक्यातील बोडखा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा नेता प्रशांत काशीराम डिक्कर (४५) हा आम्हाला खंडणीसाठी त्रास शेतकऱ्यांनी मिळून आठ दिवसांपूर्वी हिंगणा कवठळ येथे शेतात त्याला पाच लाख रुपये रोख रक्कम दिली. २१ मार्चला दुपारी एक वाजता तो प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनासाठी कार्यकर्ते घेऊन गेल्याची माहिती मिळाल्याने मी, माझे पती संदीप मोरखडे तसेच हिरालाल मोरखडे, प्रफुल मोरखडे, मोहन उमाळे, प्रशांत बावरकार यांच्यासह काही शेतकऱ्यांनो शेगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळ प्रशांत डिक्करची भेट घेतली. तेथे त्याने शासनाकडून एकरी ४० लाखांचा मोबदला मिळवून देतो असे सांगितले.मात्र त्यासाठी आणखी पैसे द्यावे लागतील, अशी मागणी केली. त्यावेळी दिलेले पाच लाख रुपये परत मागितले असता त्याने धमकावले, पैसे न दिल्यास तुमच्याविरोधात शासनाकडे आंदोलन करून तुम्हाला शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच खंडणी दिली नाही तर माझ्या कार्यकत्यांकडून जिवानिशी ठार मारून गायव करू, अशा धमक्या दिल्या. अशा तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपी प्रशांत डिक्करला अटक केली,

0 9 5 2 9 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *