धोत्रा नंदईसह चौदा गावांना चोखासागरमधून मिळणार पाणी:-आ. मनोज कायंदे यांचे शर्थीचे प्रयत्न

Khozmaster
1 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील जीवनवाहिनी असलेल्या खडकपूर्णा नदीवरील संत चोखासागर धरणाच्या उपकालव्यांच्या लाभ क्षेतात्रील परिसरातील धोत्रा नंदईसह १४ गावांना सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भात तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात आमदार मनोज कायंदे यांनी या विषयासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासमवेत मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेतली होती. खडकपूर्णा धरणाच्या सिंचनाचा प्रश्न विदर्भउपकालव्यांमधून जवळपास पाटबंधारे विकास १६७३ हेक्टर जमिनीवरील महामंडळाच्या काही ठरावांमुळे निर्माण झाला होता. वरील क्षेत्र वगळण्याची संबंधित लाभधारकांची मागणी असल्याने हा ठराव करण्यात आला. मात्र
यामुळे परिसरातील गावांना पाणी जवळ असूनदेखील मिळत नसल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. दरम्यान, याच प्रश्नावर अभ्यास करून आमदार मनोज कायंदे यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना समस्या सांगितली. २००८ पासून या विषयासाठी शेतकरी व डावा कालवा कृती समितीच्या वतीने सातत्याने आंदोलने, मोर्चे व उपोषण करत मागणी करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. सोबतच या विषयीचे पत्र देऊन शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ या विषयाची गंभीर दखल घेऊन सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

0 9 5 2 9 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *