देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी’, राजमाता नसत्या तर शिवबा घडलेच नसते. महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम केले पाहीजे, असे प्रतिपादन नंदाताई कायंदे यांनी केले.जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवसंकल्प प्रतीक्षा फाऊंडेशनच्या वतीने देऊळगाव राजा येथे ‘होय मी घडविते उद्याचा भारत’ अंतर्गत बाळाचे संगोपन करणाऱ्या शंभर मातांचा सन्मान करण्यात आला. प्रतीक्षा कुलकर्णी, देव उपाध्ये यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. यावेळी मालतीताई कायंदे, पल्लवीताई वाजपे, पूजाताई खांडेभराड, संगीताताई पिंपळे, शीतलताई खेडेकर, सरस्वतीताई टेकाळे, विद्याताई वाघ, अलकाताई मुळे, वर्षाताई कायंदे, रेखाताई बोरकर, प्रतिभा देवउपाध्ये, कल्पनाताई कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचलन ज्योतीताई सुरळीकर यांनी केले. या कार्यक्रमामध्ये शंभर माता भगिनींचा सन्मान करण्यात आला. यावेळी असंख्य महिलांची उपस्थिती होती.
Users Today : 18