शेतकऱ्यांनी केली तहसीलसमोर सातबाराची होळी

Khozmaster
1 Min Read

सिंदखेड राजा:-तालुका प्रतिनिधी

सक्तीची पीक कर्ज वसुली थांबवावी, नाफेडच्या पैशाला लावलेले होल्ड बँकेने तत्काळ काढवे यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी नेते कैलास मेहेत्रे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी २१ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर सातबाराची होळी करून शासनाचा निषेध केला.याबाबत सहायक निबंधक शितोळे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सिंदखेडराजा तालुक्यातील सातही महसुली मंडळात पिकांची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत आली होती. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील महसुली मंडळ दुष्काळी सवलती मिळवण्यास पात्र झाली असताना शासनाकडे दुष्काळी सवलत मिळवण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध मोर्चे, आंदोलने, निवेदने देऊन संपूर्ण सिंदखेडराजा तालुका दुष्काळी तालुका जाहीर करावा, जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या कामाच्या निकष रद्द करणे, पिण्याचे पाणी टँकरने पुरवणे, शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा सवलती देण्यास शेतकरी पात्र असतात, त्यामुळे येत्या दोन दिवसात शासनाने संबंधित बँकांची संपर्क साधून सक्तीची पीक कर्ज वसुली थांबवून व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नाफेड मार्फत जमा झालेले पैसे मिळवून देण्याची कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला आहे.यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 5 2 9 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *