बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी
लोकसभेत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाल्याने महायुतीने घाबरून अनेक आमिशांच्या घोषणा करीत सत्तेत आले, परंतु, त्यांना आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही. शेतकरी उध्वस्त होत असून महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. लाडक्या बहिणीचे नावे कमी करण्याचे षडयंत्र चालू असून जातीजातीमध्ये विष कालवण्याचे काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला जनतेला न्याय देण्यासाठी भविष्यातली लढाई लढायची आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विदर्भ प्रभारी अनिल देशमुख यांनी केले. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांवर संघटनात्मक जबाबदाऱ्या नुकत्याच दिल्या. त्यामध्ये विदर्भ प्रभारी म्हणून माजीमंत्री अनिल देशमुख व माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर जबाबदारी दिली. त्यानुसार पश्चिम विदर्भाच्या संघटनात्मक जिल्हास्तरीय दौऱ्यांचे आयोजन केले आहे. या दौप्यानुसार १९ मार्च २०२५ रोजी बुलढाणा राष्ट्रवादी भवनात माजीमंत्री अनिल देशमुख, माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्याध्यक्ष नरेश शेळके, प्रसन्न पाटील तथा जिल्ह्यातील नेत्यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा उत्साहात पार पडला. सुरुवातीला स्व. संतोष देशमुख, स्व.मा.मा. देशमुख, आदर्श शेतकरी स्व. कैलास नागरे, स्व. भारती पवार यांच्या निधनामुळे श्रद्धांजली वाहण्यात आली. तथा भारतीय मूल वंशाच्या शाखज्ञ सुनीता विल्यम्स त्यांच्या सहकार्यासह अंतराळामधून पृथ्वीवर सुरक्षित पोहोचल्याबद्दल त्यांचा अभिनंदनचा ठराव पारित करण्यात आला. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी शिवरायांचा जाज्वल्य इतिहास सर्वांना कायम लढण्याची प्रेरणा देणारा असून नेते शरद पवार यांनी ६० वर्ष शिवरायांच्या आदर्शावर कार्य करीत आहेत. आजही ८४ वर्षाचा योद्धा त्याच उमेदीने आलेल्या संकटांशी न डगमकता संघर्ष करताना दिसत असून त्यामुळे आपल्याला लढण्याचे बळ मिळत असल्याचे सांगितले. यावेळी हाय हॅलो न म्हणता आपण जय शिवरायांनी सुरुवात करावी, असे ठरले आहे. दुसरे विदर्भ प्रभारी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या संघर्षाच्या काळात आपण सर्व पक्षाचे काही देणे लागतो या भावनेने काम करावे, असे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर, प्रसन्नजीत पाटील, भास्करराव नाईक यांनीही आपले समयोचित भाषणे केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नागपूर प्रवीण कुंठे, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव काळे, प्रदेश सरचिटणीस संतोषराव रायपुरे, संगीतराव भोंगळ, पांडुरंग पाटील, रामभाऊ जाधव, रियाज खान पठाण, अभय चव्हाण, डॉ. रामप्रसाद शेळके, मधुकर गव्हाड, मोहन पाटील, बीटी जाधव, पीएम जाधव, शंकर महाराज, शेख साबिर, अबताब खान, रिजवान खान, रफिक शेठ, गजानन भीमसनकर, तात्या कृपाळ, कृषि उपन्न बाजार समिती संचालक बाळासाहेब पवार डी.डी. वायाळ, सुरेश बोंद्रे, लक्ष्मी शेळके, डॉ. ज्योतीताई खेडेकर, वनिता गायकवाड, नरसिमा खान, वर्षाताई इंगळे, अलकाताई जायभाय, डॉ. शरद काळे, अनिल बावस्कर, सत्तार कुरेशी, तुळशीराम काळे, गणेश कोरके, सागर पाटील, कृष्णा मिसाळ, भगवानराव शेळके, राजूभाऊ गारोळे, अमोल भट, राजू इंगळे, अरुण मोगल, जनार्धन मगर, दीपक मस्के, ज्ञानेश्वर शेळके, रामदास भोंडे, कबीर भाई, नसीम शेठ, शिवाजीराव पालकर, शिवाजीराव पडोळ, डॉ. ज्ञानेश्वर गावंडे, बाळासाहेब येसकर, अनिल कोळसे, विजय पडोळ यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Users Today : 18