सिंदखेड राजा:- तालुका प्रतिनिधी
राजस्व मंडळ दुसरबीड अंतर्गत जऊळका, ताडशिवनी, पिंपळगाव कुडा, दुसरबीड येथील शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थ दिनाचे आयोजन करण्यात आले होते.येथील ग्रामपंचायत कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या संकल्पनेतून व तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ग्रामस्थ दिन कार्यक्रमास दुसरबीड सरपंच सरस्वती मखमले, उपसरपंच अशोकराव गुंजाळ, जऊळका सरपंच गजानन मुंढे, पिंपळगाव कुडा सरपंच सुनीता गणेश कुंडे, ताडशिवणी सरपंच कैलास भुमकर, अशोक बुरकुल, दिपक डोंगरदिवे, मीना होळकर, रामदास मेहेत्रे, ग्रा.पं. सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी गावातील लोकांना महसूल विषयक, कृषी विषयक, ग्रामपंचायत विषयक, अॅग्रीस्टॅक, संजय गांधी योजना, जिवंत सातबारा व इतर विषयी माहिती देण्यात आली. उपस्थितांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकरी बांधवांना ग्राम महसूल अधिकारी वसुदेव जायभाये, मंडळ अधिकारी गजानन मनसुटे यांनी तक्रारीचे निवारण करून मार्गदर्शन केले.
Users Today : 18