नांदुरा:-तालुका प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे खाजगी संस्थेकडून केलेले मूल्यांकन, त्यावरून केलेली बेकादेशीर व नियमबाह्य करवाढ रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी महायुतीच्या वतीने २१ मार्च २०२५ रोजी नगरपालिकेवर मोर्चा धडकला.यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर मुन्हेकर व भाजपाचे ज्येष्ठ नेते हभप रामभाऊ झांबरे यांच्या उपस्थित मुख्याधिकारी यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. नगरपालिकेने ज्या संस्थेकडून शहरातील जागांचे मोजमाप करण्यात आले आहे, त्या संस्थेकडून अप्रशिक्षित व अनुभव नसलेल्या शिकाऊ युवकांकडून शहरातील जागांचे मोजमाप करून माहिती घेण्यात आली आहे. तसेच नगरपालिकेकडून कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याकडून त्याचे पुनर्निरीक्षण किंवा पाहणी न करता तसेच त्या माहितीची खात्री जमा न करता नगरपालिका अधिनियमाचा भंग करण्यात आलेला आहे, त्यामुळे बेकादेशीर व नियमबाह्य करवाढ रद्द न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर सुधीर मुरेकर, अनिल जांगडे, प्रमोद हिवाळे, रवी डंबेलकर, प्रदीप हेलगे, सारिका डागा तसेच भारतीय जनता पार्टी, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे शिवसेना, रिपाइं आठवले या पक्षाचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 25