समृद्धीवर विचित्र अपघातात एक ठार; दोन गंभीर

Khozmaster
2 Min Read

डोणगाव:-तालुका प्रतिनिधी 

समृद्धी महामार्गावरील डोणगाव जवळ मुंबई कॅरिडोरवर २१ मार्चच्या सकाळी ३ वाजता दोन वाहनांच्या अपघातील जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असताना मागून येणाऱ्या एका वाहनाने ४ वाजेदरम्यान धडक दिली. या विचित्र अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. तर अपघातील तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.डोणगाव पासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावर एचपी पेट्रोल पंप जवळ चॅनल नंबर २६८ वरती मुंबई कॅरीडोरवर एमएच २१-बीएच ८२९९ या क्रमांकाच्या ट्रक चालक नामे शेख इसाक शेख बादशाह रा. जालना हा ८० च्या लेन मधून जात असताना मागून येणारे आयशर चालक मिराज अहमद यास झोपेची डुलकी लागल्याने समोरील ट्रकला मागून जबर धडक दिली. या धडकेत आयशर मधील मिराज अहमद आणि अमजद अली रा. अमेठी उत्तर प्रदेश यांना गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस, रॅपिड अॅक्शन फोर्स व डोणगाव पोलीस यांनी बचाव व मदत कार्य करीत असताना समृद्धी महामार्गावर काही वाहने थांबलेली होती. दरम्यान, पाठीमागून येणारे एमएच ०४-जेयु ९९२४ क्रमांकाचा कंटेनरचा चालक सद्दाम खान रा. उत्तर प्रदेश याने आयशरला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कंटेनर चालक सद्दाम खान व सोबत अजीत यादव दोन्ही रा. उत्तर प्रदेश यास किरकोळ दुखापत झाली. सदर जखमींना अॅम्बुलन्सद्वारे सामान्य रुग्णालय मेहकर येथे पाठविण्यात आले. तर गंभीर जखमी अमजत अली रा. अमेठी उत्तर प्रदेश यांना बुलढाणा येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक पवार, दीपक पिटकर, एएसआय विठ्ठल खोडे, योगेश शेळके, डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमर नागरे, नितीन डुकरे, हर्ष सहगल व क्विक अॅक्शन फोर्स यांनी मदत केली. एमर्जन्सी महामार्गावर वाहने उभी राहत असल्याने अपघातात वाढ समृद्धी महामार्गावर इमर्जन्सी लेनवर मोठी अवजड, मालवाहू शेकडो वाहने उभी राहतात. या वाहनाना उभे राहण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर जागा देण्यात आलेली आहे. मात्र, वाहन उभे करण्यासाठी पेट्रोल पंपावर शुल्क आकारल्या जातो. त्यामुळे कित्येक वाहने इमर्जन्सि रोडवरच उभी राहतात. त्यामुळे अपघातात वाढ होत असल्यामुळे याकडे समृद्धी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

0 9 5 2 9 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *