एचआयव्हीबाधित रुग्णांसोबत सामंजस्याने वागा :-सूरज सिंग

Khozmaster
1 Min Read

आलेगाव:-तालुका प्रतिनिधी

तालुक्यामध्ये एच आय व्ही पॉझीटीव्ह असलेल्या ऋग्णाना गावपातळीवर मतभेदाचा सामना करावा लागतो. आणि ह्या मतभेदांमुळे, अनेक रुग्ण आत्महत्या किंवा मानसिक त्रासाला बळी पडतात. वास्तविक सदर आजार हा निडल, रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध यामुळे होण्याचा संभव असतो. आणि याला रोख लावण्यासाठी सरकारने नीडल, रक्त या बाबत नियंत्रण आणले आहे. त्यामुळे अशा आजारावर नियंत्रण आले आहे. भाग्योदय आरोग्य संस्था आणि ग्रामीण रुग्णालय चतारी यांच्या संयुक्त विद्यमाने आलेगाव मराठी शाळे मध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्हा साधन व्यक्ती सूरज सिंग जाधव बोलत होते. पुढे बोलताना सदर आजार हा बेड, संपर्क अथवा खाण्या पिण्यातून होत नसल्याचे सांगून एच आय व्ही बाधित रुग्ना सोबत मतभेद न करता त्यांच्या सोबत आपुलकीने वागणे महत्वाचे आहे. त्यांची हेळ सांड न होऊ देता त्यांना नागरिकांनी आधार देणे महत्वाचे आहे. तसेच बाधित रुग्णांना सरकारकडून निराधार, एसटी बस अशा सवलती असल्याचे सांगितले. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ग्राम पंचायत सरपंच गोपाल गणपतराव महल्ले होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राम विकास अधिकारी देशमुख, वैद्यकिय अधिकारी साक्षी चव्हाण, स्नेहा भावे, पत्रकार श्रीधर लाड, डॉ किशोर भारस्कर, ग्रा पं सदस्य संजय गावंडे होते. सुपर वाईजर सागर नवलकार, विशाल रोकडे अंकुश अंभोरे यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी आशा सेविका, लिंक वर्कर सागर पदमने व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

0 9 5 2 9 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *