रिसोड:-तालुका प्रतिनिधी
सामाजिक जागरूकता व मासिक पाळी संदर्भात जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा निजामपूर येथे किशोरवयीन मुलींचा मेळावा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रूपाली पंडित व सोनाली वाघमोडे यांनी शाळेतील मुलींना मार्गदर्शन केले. सामाजिक जागरूकता अंतर्गत चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, परकीय व्यक्ती तसेच आप्तेष्टांकडून होणाऱ्या शारीरिक मानसिक शोषणापासून दक्षता, कोणत्याही भुलथापांना बळी न पडण्याचे आवाहन, होणाऱ्या पिळवणुकी विरुद्ध आवाज उठवून घरच्यांना वेळीच माहिती देऊन जागरूक राहणे इत्यादी बद्दल माहिती देण्यात आली. मासिक पाळीचे व्यवस्थापन अंतर्गत मुलींच्या मनातून मासिक पाळीची भीती काढणे, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करणे, मासिक पाळी दरम्यान घ्यावयाची दक्षता व स्वच्छता याबद्दल माहिती देण्यात आली. नॅशनल पेमेंट कॉपोर्रेशन ऑफ इंडिया मार्फत पुरविण्यात आलेल्या पॅडचे या प्रसंगी किशोरवयीन मुलींना वितरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक अर्जुन वरघट, शिक्षक अरविंद इंगोले, धीरज जाधव, पुष्पा संबळे, प्रमोद वाबळे, अॅड. सतिष पंडीत यांची उपस्थिती होती.
Users Today : 25