अमरावती विद्यापीठाची एकदिवशीय कार्यशाळा सरपंच कदम प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या स्व. डॉ. श्रीकांत जिचकार मेमोरीयल रिसर्च सेंटर सभागृहात २४ मार्च २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन व सद्यस्थिती’ या विषयावर एक दिवसीय आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून मोताळा तालुक्यातील सिंदखेडचे सरपंच प्रवीण कदत यांना  निमंत्रित करण्यात आले आहे.संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातंर्गत एम. ए. आजीवन अध्ययन व विस्तार ह्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या वतीने २४ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे जलव्यवस्थापन व सद्यस्थिती’ या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.पाणी हा मानवाच्या – जिवनातील अत्यंत महत्वाचा न घटक असून आज पाण्याचा अपव्यय वाढलेला दिसून येत आहे. ज्यामुळे आज र सजीवसृष्टीचे अस्तित्व कायम असून अशा पाण्याचा उपद्रव जर होत असेल तर भविष्यात लवकरच पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. याच पाश्वंभुमिवर छत्रपती शिवाजी व महाराजांचे जलव्यवस्थापनाचा . आदर्श डोळ्यासमोर ठेऊन वर्तमान परिस्थितील पाणी व्यवस्थापनावर नियंत्रण राहावे, यासाठी सदर कार्यशाळेचे न प्रयोजन आहे. या एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेला विद्यार्थी, संशोधक, इतिहास अभ्यासक, शिक्षक व पाणी व्यवस्थापनावर काम करणारे कर्मचारी सहभागी राहणार आहेत. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सिंदखेड सरपंच प्रवीण कदत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सरपंच कदम यांच्या नेतृत्त्वात व मार्गदर्शनाखाली सिंदखेडने आजपर्यंत पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेत राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळविला असून आयएसओ ग्रामपंचायत, कृषी विभाग पुरस्कार, जिल्हा स्मार्ट ग्राम, कोविड लसीकरण तालुक्यात प्रथम, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समावेश असलेले तालुक्यातील एकमेव गाव, संत गाडगेबाबा अभियान विभागात तृतीय, माझी वसुंधरा अभियान विभागात प्रथम, माझी वसुंधरा अभियान राज्यात द्वितीय, फार्मर कप स्पर्धेत तालुक्यात प्रथम तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव पंचायत लर्निंग सेंटरसाठी सिदखेडची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीची दखल घेवून सरपंच कदम यांना विद्यापीठाच्या एकदिवशीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

0 9 5 2 9 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *