संरक्षक भिंतीच्या कामात दिरंगाई नको! नाभिक संघटनेचा ठाम इशारा

Khozmaster
2 Min Read

देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी

राष्ट्रसंत श्री संत सेनाजी महाराज सामाजिक सभागृहाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी मंजूर झालेला निधी तत्काळ वापरावा आणि कोणताही अनावश्यक बदल न करता लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी मागणी नाभिक संघटना, तालुका देऊळगाव राजा यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात आज आमदार मनोज कायंदे (सिदखेडराजाविधानसभा मतदारसंघ) यांना अधिकृत निवेदन देण्यात आले.संरक्षक भिंतीसाठी २७-२८ लाखांचा निधी मंजूर श्री संत सेनाजी महाराज सामाजिक सभागृहाच्या सुरक्षेसाठी माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या निधीतून मंजूर करण्यात आला होता सुमारे २७ ते २८ लाख रुपये निधी मंजूर झाला असून यासाठी आवश्यक वर्क ऑर्डर देखील निघालेली असून, हा निधी मूळ उद्देशासाठी वापरण्यात यावा, अशी ठाम भूमिका नाभिक संघटनेने घेतली आहे. या कामा साठी मोठं राजकारण होतांना दिसत आहे. काम कोनाच्या नावांवर संबंधीत काम दुसरेच करत आहे. सर्व मन मानी कारभार होताना दिसत आहे. तरी लोकप्रतिनिधी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. निधी मंजूर ज्या कामासाठी झाला आहे. त्याच कामासाठी वापरल्या जातांना दिसत नाही आहे तरी या वर आमदार मनोज कार्यदे यांना निवेदन देण्यात आले आहे. तसा त्यांनी निवेदन देते वेळी शब्द दिला आहे. कि निधी ज्या कामासाठी आला आहे. त्याच कामासाठी वापरला जाईल. नाभिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काम त्वरित सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.संरक्षक भिंतीच्या कामात अनावश्यक बदल केल्यास किंवा काम रखडल्यास संपूर्ण नाभिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. संघटनेची प्रमुख मागणीः मंजूर निधी संरक्षक भिंतीसाठीच वापरण्यात यावा. कोणताही अनावश्यक बदल न करता मूळ स्वरूपातच काम करावे. संरक्षक भिंतीचे काम त्वरित सुरू करावे. प्रशासनाने लक्ष दिले नाही, तर संघटनेच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 9 5 3 0 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *