देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
स्थानिक श्री व्यंकटेश महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ या विषयावर आयोजित एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारोह प्रसंगी या चर्चासत्राचे उद्घाटन मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. विलास खंदारे यांनी वरील उद्वार काढले. बीजभाषक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा (गुजरात) येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या प्रा. डॉ. रूपाली अंबडकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून अर्थशास्व विभागप्रमुख व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे उपस्थित होते. मराठवाडा अर्थशास्त्र परिषदेचे सचिव डॉ. विश्वनाथ कोक्कर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगरचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. दिलीप मिसाळ हे देखील मंचावर उपस्थित होते.उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना प्रोफेसर डॉ. विलास खंदारे यांनी अर्थसंकल्पाची संकल्पना व रचना स्पष्ट केली तसेच अर्थसंकल्प २०२५ ची सविस्तर माहिती दिली व विविध उदाहरणांच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर प्रकाश टाकला. बीजभाषक प्रा. डॉ. रूपाली अंबडकर यांनीसुद्धा पावर पॉइंट प्रेइंटिशनच्या माध्यमातून केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदीविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अर्थसंकल्पीय तरतूद व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये सरकारकडून कृषी क्षेत्राकडे वर्षानुवर्षे होत असलेले जाणीवपूर्वक दुर्लक्ष हेच भारतीय कृषी व ग्रामीण क्षेत्राच्या मागासलेपणाचे मुख्य कारण असल्याचे प्रतिपादन केले. उद्घाटन समारोहाचे सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा. मधुकर जाधव यांनी केले. प्रास्ताविक चर्चासत्र सहसमन्वयक डॉ. विनोद बन्सीले यांनी केले. अतिथी परिचय डॉ. ज्योती ढोकले यांनी करून दिला.चर्चासत्रामध्ये प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शोधनिबंध वाचन सत्रादरम्यान प्राचार्य डॉ. राजेंद्र बोरसे, प्राचार्य डॉ. संजय दांदडे यांनी मार्गदर्शन केले. सीजीएसटी अँड सीएक्स अधीक्षक श्री. दीपक गुप्ता यांनी जीएसटी विषयी सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात प्रा. डॉ. गणेश दराडे, प्रा. डॉ. वासुदेव गोलाईत, प्रा. डॉ. उदय काळे, संशोधक विद्यार्थी श्री. विजय मॉडे यांच्यासह अभ्यासकांनी शोधनिबंध वाचन केले. मान्यवरांचा परिचय डॉ. गजानन तांबडे यांनी दिला. सूत्रसंचालन डॉ. अशोक सवडे यांनी केले. चर्चासत्राचा समारोप समारोह अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. विजय नागरे, अधीसभा सदस्य प्रा. डॉ. संतोष कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या चर्चासत्रात एकूण १०८ अभ्यासक सहभागी झाले. समारोप समारंभामध्ये अतिथी परिचय प्रा.डॉ. अनंत आवटी यांनी दिला तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी मानले. चर्चासत्रादरम्यान प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे संपादित ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ आणि भारतीय कृषी व ग्रामीण क्षेत्र’ तसेच प्रा. डॉ. नरेंद्र शेगोकार संपादित ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ आणि भारतीय सेवा क्षेत्र’ आणि प्रा. डॉ. विनोद बन्सिले संपादित ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ आणि भारतीय औद्योगिक क्षेत्र’ या तीन संपादित ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन देखील करण्यात आले.या चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. अशोक सवडे व प्रा. डॉ. योगेश आठवे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्राध्यापक, संशोधक व महाविद्यालयीन विद्यार्थी या चर्चासत्रासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 27