चिखलीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

चिखली शहरात दिनांक १७ मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाआरती केली आणि त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. जय शिवरायांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभाग घेतला आणि आनंद साजरा केला. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मायाताई म्हस्के, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, चिखली तालुका प्रमुख गजानन मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे, युवासेना तालुका प्रमुख गोपी लहाने, राजेश पवार, कैलास भालेकर, गजानन म्हस्के आणि नितीन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नेतृत्व चिखली शहर प्रमुख विलास घोलप यांनी केले. यावेळी उपशहर प्रमुख विनोद वनारे, बंडू नेमाने, अमर सर, पवन चिंचोले, शिवाजी शिराळे, उपतालुका प्रमुख पंजाबराव जावळे, जितू पुरोहित, किरण दानवे, नासिक सौदागर, नारायण गरड, रवी अंभोरे, समाधान जाधव, विकी निकाळजे आणि ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संकल्प करण्यात आला. उत्सवाचा जोश आणि जयघोषाने संपूर्ण परिसर प्रेरणादायी बातावरणाने भारावून गेला होता.

0 9 5 3 0 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *