झी मराठीची भाग्यश्री खानोदे रंगविणार या वर्षीची चैत्र पाडवा पहाट

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी

चिखली नगरीतील चैत्र पाडवा पहाट बा प्रभात सांस्कृतिक सोहळ्याचे हे १९ चे वर्ष, गेली अठरा वर्षे महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांच्या गायकीचा आस्वाद चिखलीकर रसिक या सोहळयाच्या माध्यमातून घेत आला आहे. सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात तसा बुलडाणा जिल्हा जरा मागेच आहे. परंतु चिखली नगरीतील विवेकानंद शिकवणी मधील माजी विद्यार्थी वर्गाच्या सहभागातून हा सोहळा निः शुल्क आणि निःस्वार्थ भावनेने आजही सुरु आहे, शहरातील विवेकानंद क्लामेराचे संचालक इरतकर सर आणि त्यांनी घडविलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून २००७ पासून या प्रभात संगीत सोहळ्याची सुस्नात झाली. झरी मराठीची वैशाली म्हैसने-माडे, गौरव महाराष्ट्राची विजेती धनश्री देशपांडे, भजन सम्राट बाळासाहेब वाईकर, पंडीत भिमसेन जोशींचे शिश्य पं. संजय गरुड इ. अनेक कलावंतांनी चिखलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केलेले आहे. रविवार दि. ३० मार्च २०२५ च्या पुढीपाडव्याला पहाटे ४.३० वाजता यवतमाळ येथील श्री पुर्णाजी खानोदे आणि संच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. श्री पुर्णाजी खानोदे यांची सुकन्या कु. भाग्यश्री खानोदे (श्री-मराठी, अबधा रंग एक झाला फेम) हिचे देखील सुत्राव्य गायन रसिकांना ऐकायला मिळणार आहे. सौ. मनिषा वानखडे व युवा गायक ऋषभ हटकर यांची गायकी श्री पुर्णाजीच्या गायकी सोबत रसिकांना जवण करावयास मिळेल. तबला अभिषेक लोखंडे, बासरी-राम लाहळकार, किबोर्ड सुनील बेडसकर, आक्टोपॅड- ज्ञानेश्वर धनभर आणि या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्र संचलन प्रा. सौ. नीता भालेराय करणार आहेत. चिळली येथील एस.पी. एम. महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ४.३० वाजता होऊ घातलेल्या या कार्यक्रमास रसिकांनी अलोट गर्दी करावी, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

0 9 5 3 0 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *