लोणार:-तालुका प्रतिनिधी
(वाजिद खान) श्री संत गजानन महाराज सेवाभावी वारकरी शिक्षण संस्था अंजनी खुर्द तालुका लोणार तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंजनी खुर्द ते शेगाव पायदळ वारीचे नियोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे प्रयाण मिती चैत्र शु वार मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी सकाळी अंजनी खुर्द येथून होणार असून दिंडीचा समारोप मिती चैत्र शु ९ वार रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीरामनवमीच्या शुभ मुहूर्तीवर होणार आहे. या पायी दिंडीसाठी दररोज संध्याकाळी मुक्कामीच्या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार महाराजांतर्फे किर्तन सेवा देण्यात येणार असून अनेक भक्तांतर्फे ठीक ठिकाणी चहापाणी, फराळाचे व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये सामील होणाऱ्या भक्तांसाठी आयोजकांतर्फे नियमावली तयार करण्यात आली असून ती नियमावली पोम्प्लेट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी ज्या भक्तांना या दिंडीचे नियम पाळून दिंडीमध्ये सामील व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून देण्याचे आवाहन लोणार तालुका वारकरी महामंडळाच्या वतीने व दिंडी प्रमुख विश्वस्त मंडळ श्री संत गजानन महाराज सेवाभावी संस्थान अंजनी खुर्द च्या वतीने करण्यात आले आहे.
Users Today : 27