जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. एस. व्ही. जाधव सर यांच्या अध्यक्षतेत तालुका वकील संघासाठी ‘ई-कोर्ट्स’ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Khozmaster
2 Min Read

मलकापुर:-तालुका प्रतिनिधी 

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या वतीने तालुका वकील संघातील विधीज्ञ व वकीलांचे कारकुन यांच्यासाठी अत्याधुनिक न्यायिक प्रक्रियेशी संबंधित ई-कोर्ट्स ट्रेनिंग प्रोग्राम (ECT ७ २०२४) चे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज दि. २१ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. यासंदर्भात, मुंबई उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय बुलडाणा आणि मुंबई व महाराष्ट्र न्यायिक अकादमी, उत्तान यांनी पाठविलेल्या पत्रानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशिक्षणाचा उद्देश न्यायालयीन कामकाज डिजिटल स्वरूपात अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे हा आहे. प्रशिक्षणाची वैशिष्ट्‌येः ई-कोर्ट्स प्रणालीचे सखोल मार्गदर्शन, नवीनतम न्यायालयीन सॉफ्‌टवेअर्स व तंत्रज्ञान प्रशिक्षण न्यायालयीन कागदपत्रांचे ई-फायलिंग व व्यवस्थापन, ऑनलाइन सुनावणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादरीकरण या कार्यक्रमाचे प्रमुख प्रशिक्षक अॅड. जी. डी. पाटील तसेच अॅड. पी. सी. कुलकर्णी यांनी या प्रशिक्षणाची महत्वकांक्षा स्पष्ट करताना सांगितले की, ‘न्यायव्यवस्थेत डिजिटल युगातील आधुनिक साधने आत्मसात करणे आवश्यक आहे व त्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे वकिलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हे मोलाचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. तालुक्यातील सर्व वकील व वकीलांचे कारकून यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला, या उपक्रमामुळे न्यायालयीन कामकाज अधिक सुलभ, जलद व पारदर्शक होण्यास मदत होणार आहे हे नक्की, तसेच या कार्यक्रमात महत्वाची उपस्थिती म्हणून अॅड. जे. डी. तायडे, अॅड. डी. एम. बागडे, अॅड. व्ही. एम. पाटिल, अॅड. एस. डी मराठे, अॅड. पानमवार, अॅड. उदय व्ही. कपले, अॅड. नाफडे अॅड. भिसे, अॅड. देशमुख, अॅड. नारखेडे सह आदिंची उपस्थिती होती.

0 9 5 3 0 1
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *