हाणामारीतील गंभीर व्यक्तीचा मृत्यू

Khozmaster
2 Min Read

साखरखेर्डा:-तालुका प्रतिनिधी 

गोरेगाव येथील एका व्यक्तीला काहींनी शुल्लक कारणावरुन बेदम मारहाण केल्याची घटना १८ मार्च रोजी घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमाव रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, आज २३ मार्च रोजी उपरोक्त इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे साखरखेर्डा पोलिसांनी दाखल प्रकरणात खुनाचे कलम सामाविष्ट केल असून गुन्ह्यातील चारही आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.उमनगाव येथील रामदास खिल्लारे यांचे डिगाबंर कव्हळे यांच्यासोबत भांडण झाले होते. रामदास खिल्लारे आणि शोभा कव्हळे यांची शेतजमीन जवळजवळ असल्याने रामदास खिल्लारे हा शेतातील कामात त्यांना मदत करीत होता. शोभा कव्हळे यांच्या घरी जाणे-येणे वाढल्याने डिगांबर कव्हळे यांनी रामदासला हटकले. नव्हेतर १८ मार्च रोजी रामदास आणि डिगांबर यांच्यात भांडण झाले. याचा राग आल्याने शोभा कव्हळे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या दोन्ही मुलाला बोलावून डिगांबर कव्हळे यांचा काटा काढण्याचे सांगितले. कृष्णा कव्हळे हा जाब विचारायला गेला असता, रामदास खिल्लारे यांच्यासोबत असलेले आकाश कव्हळे, राहूल कव्हळे यांनीही शिविगाळ करीत डिगांबर कव्हळे यास लोखंडी रॉड, कुऱ्हाड आणि लाठ्याकाठ्याने जबर मारहाण केली. यात डिगांबर कव्हळे यांच्या डोक्यात जबर मार लागला व रक्तबंबाळ झाले होते. गंभीर अवस्थेत त्यांना प्रथम बुलढाणा नंतर जळगाव व प्रकृती अस्वस्थ झाल्याने मुंबई येथे हलविण्यात आले. मुंबई येथील रुग्णालयात आज २३ मार्चच्या सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत कृष्णा कव्हळे देखील जखमी झाला आहे.या प्रकरणी कृष्णा कव्हळे यांच्या तक्रारीवरुन साखरखेर्डा पोलिसांनी आकाश कव्हळे, राहूल कव्हळे, शोभा कव्हळे (रा. गोरेगाव) आणि रामदास खिल्लारे (रा. उमनगाव) याच्याविरुध्द बीएनएसचे कलम १०९, ११८ (२), ११५ (२), २९६, १५१ (२), ४९, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या होत्या. २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी भोगल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. दरम्यान, डिगांबर कव्हळे यांचा मृत्यू झाल्याने साखरखेर्डा पोलीस उपरोक्त गुन्ह्यात कलम १०३ (२) सामाविष्ट केले असून पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड हे करीत आहेत.

0 9 5 3 1 6
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *