ऑक्सीजन सिलिंडरच्या स्फोटात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

ऑक्सीजन सिलेंडर ऑटो रिक्षात ठेवत असतांना आटो रिक्षातील एका सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज २३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक लक्ष्मीनगरस्थित शिवराज फायर सर्विसेस येथे घडली.रुग्णालयांमध्ये वापरली जाणारी ऑक्सिजन सिलेंडर भरून विक्री करण्याचा व्यवसाय देशमुख परिवाराने लक्ष्मीनगर परिसरात शिवराज फायर सर्व्हिसेस अंतर्गत सुरू होता. नेहमीप्रमाणे ऑक्सिजन सिलेंडर पोहोचविण्याकरिता ऑटोरिक्षात सिलेंडर ठेवण्याचे काम सुरू होते. दरम्यान ऑटो रिक्षात ठेवलेल्या एका सिलेंडरचा अचानक स्पोट झाला. या स्फोटाने परिसराला जोरदार हादरा बसला. या अपघातात अनंत देशमुख (वय ४४ वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा नातेवाईक गणेश देशमुख (वय २३ वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून, ऑटो चालक महाजन हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर डॉ. अरविंद कोलते यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. वृत्त लिहेस्तोवर या प्रकरणी पोलिसांत कोणताच गुन्हा दाखल नव्हता.

0 9 5 3 1 6
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *