समाजभूषण पुरस्कार विजय इंगळे यांना जाहीर

Khozmaster
1 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवा ट्रस्ट मलकापूर यांच्याद्वारे दिला जाणारा दरवर्षीचा मानाचा समाज भूषण पुरस्कार यावर्षी वडनेर भोलजी येथील महाराष्ट्र बँकेत व्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेले विजय शालिग्राम इंगळे यांना जाहीर झाला आहे.दरवर्षी पुरस्कार सुशिक्षित आणि समाजासाठी भूषण असलेल्या लोकांना देण्याची परंपरा आहे. या वर्षी सुद्धा सदर परंपरा कायम ठेवून संस्थाध्यक्ष अजय सावळे यांनी सर्वानुमते यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार विजय इंगळे जाहीर केला आहे. इंगळे हे नांदुरा तालुक्यातील वडनेर येथील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच घरी अठरा विश्व दारिद्र, शिक्षणासाठी कोणते प्रकारे पोषक, असे वातावरण नसताना त्यांनी आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीन आणि कष्टाने अभ्यास करत शिक्षण पूर्ण केले. बँकिंगची परीक्षा उत्तीर्ण करत व्यवस्थापक पदावर नियुक्ती मिळविली, हे विशेष !

 

0 9 5 3 1 5
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *