नयन ओव्हर व सुरेश सरकटे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Khozmaster
2 Min Read

दाभा:-विशेष प्रतिनिधी 

लोणार तालुक्यातील संतनगरी जाफराबाद येथील प्रख्यात बबनराव महाराज ओव्हर यांचे नातू बालशिवव्याख्याते नयन शिवशंकर ओव्हर यांना राज्यस्तरीय ‘बालवक्ता पुरस्कार’ व सामाजिक कार्यकर्ते शैलेश सरकटे यांना ‘क्रांतीवीर गुरुवर्य लहुजी साळवे स्मृतिप्रित्यर्थ’ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.नयन पाटील ओव्हर यांनी वयाच्या ९ व्यावर्षी वस्ताद लहुजी साळवे यांच्या जिवनावर आपल्या जबरदस्त वक्तृत्व शैलीने प्रकाश टाकला आणि सर्व श्रोते मंडळींना मंत्रमुध्द केले आणि त्या नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नयन यांना राज्यस्तरीय बालक्क्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.नयन अगदी बालवयापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर अभ्यास करून गावोगावी शिवव्याख्यान करीत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, गीत, विविध प्रसंग आपल्यासुमधुर वाणीतून सादर करीत असल्याने नयन यास सदर पुरस्कार देण्यात आला आहे. तर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे युवा नेतृत्व शैलेश सरकटे यांना ‘क्रांतीवीर गुरुवर्य लहुजी साळवे स्मृतिप्रित्यर्थ’ राज्यस्तरीय पुरस्कार गुंधा येथील ‘क्रांतीगुरु बहुद्देशीय सेवाभावी संस्था’ यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैलेश सरकटे यांनी विशेषतः विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने प्रयत्ने ले आहेत. जिल्हा परिषद शाळांमधील १००० हून अधिक विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणप्रेमी वृत्तीला चालना दिली आहे. याशिवाय, अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्यासाठी त्यांनी विविध मार्गदर्शन शिबिरे व रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘क्रांतीगुरु बहुद्देशीय सेवाभावी संस्था गुंधा’ संस्थेचे वतीने सदर पुरस्कार देण्यात आला आहे.

0 9 5 3 1 5
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *