मानधन थकल्याने दिव्यांग, विधवा, परितक्त्यांवर उपासमारीची वेळ मानधन तत्काळ खात्यात जमा करण्याची मागणी

Khozmaster
1 Min Read

मोताळा:-तालुका प्रतिनिधी

संजय गांधी योजना, दिव्यांग, परितक्ता महिला, इंदिरा गांधी महिला विधवा यासह आदी विविध योजनांचे मानधन मंजूर झालेले आहे. असे असतांना देखील ५ महिन्यापासून लाभार्थ्यांचे बँक खात्यात जमा झालेले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अनुदान तत्काळ खात्या जमा करयाची मागणी उबाठा शिवसेना दिव्यांग सेल जिल्हा उपाध्यक्ष अविनाश वाकोडे व दिव्यांग बांधवांच्या वतीने मोताळा तहसीलसदारांकडे करण्यात आली आहे.मोताळा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, संजय गांधी योजना, दिव्यांग, विधवा, परितक्ता महिला, इंदिरा गांधी महिला विधवा योजना, श्रावणबाळ सेवा योजनेचे अर्ज ३० सप्टेंबर २०२४ मध्ये मंजूर झाले आहेत. मात्र, ५ महिन्यापासून लाभार्थ्यांचे बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य विधवा योजनेचे अर्ज ऑनलाईन २२ मे २०२४ पासून केले आहे. मात्र ते १० महिन्यापासून पडून असल्याचे निवेदनात नमुद असून सदर सदर अर्ज निकाली काढण्यात यावे, संजय गांधी विधवा, श्रावणबाळ योजना, विधवा योजनेचे अर्ज ३० डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ऑनलाईन केलेले अर्ज ई-आधार कार्ड घेणे थांबविण्यात यावे, विविध योजनेचे मानधन तत्काळ जमा करण्यात यावे, अशी मागणी देखील अविनाश वाकोडे, मंगला ऐकदम, वैशाली कोळसे, वंदना शिरसाट, पुर्णाबाई गणबास, मंगला ठाकरे, उषाबाई वाघ, लताबाई तमगार, रंजना तमगार, सिंधू धनवटे, दयाबाई कांबळे, अलका तायडे, अनिता पवार, कल्पना तामगर, शालीग्राम दुतोंडे यांनी केली आहे.

0 9 5 3 1 5
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *