शहीद कैलास पवार जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

Khozmaster
1 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

भारत मातेचे वीर सुपुत्र शहीद जवान कैलास भारत पवार यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक गजानन नगरातील पंचशील बुद्ध विहार येथे २२ मार्च रोजी आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन शहीद कैलास भारत पवार फाउंडेशन आणि समस्त चिखलीकर बांधव यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद जवान कैलास पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शिबिरात ५० ते ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद पवार यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात पंचशील बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष साहेबराव बोरकर, नगरसेवक दत्ता सुसर, सग्राट अशोक, फुले, शाहू, आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत शिनगारे, प्रा. मिलिंद मघाडे, मनोज दाभाडे, नरेंद्र पवार, विलास घोरपडे, विशाल खरात, प्रशांत डोंगरदिवे, ओंकार कासारे, गणेश बोर्डे, राहुल साबळे, राहुल वानखेडे, पत्रकार छोटू कांबळे, संतोष जाधव, विकास कस्तुरे, विनोद कळसकर, राजेंद्र सुरडकर, शहीद कैलास पवार यांचे वडील भारत पवार व भाऊ अक्षय पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचशील बुद्ध विहार समिती तसेच शहीद कैलास पवार फाउंडेशनचे सर्व सदस्य आणि चिखलीकर बांधवांचे विशेष कौतुक करण्यात आले.

0 9 5 3 1 5
Users Today : 41
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *