देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करत गोरगरिबांची सण गोड होण्यासाठी जाहीर केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहे. दिवाळी, गुढी पाडवा, गौरी गणपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणांना अल्प दरात आनंदाचा शिधा वाटप केला जायचा. १४ एप्रिलही तोंडावर आले असताना आनंदाचा शिधा वाटपाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. त्यामुळे ही योजना बासनात गुंडाळली जाते की काय, असा आरोप देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केला आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुती सरकारला जबरदस्त धक्का दिल्याने महायुती सरकारने जनतेसाठी घोषणेचा महापूर केला व विविध योजना अंमलात आणल्या. महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्या. मात्र, सरकार आल्यानंतर आता ना. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणलेल्या योजना या सरकारने बंद केल्या. यामध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्या योजनेत १५०० रुपयांवरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले, पण त्याला फाटा दिला. शिवाय ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ दिला विविध कारणे सांगून अपात्र केल्या जातात. याच बरोबर १० हजार महिलांना गुलाबी रिक्षा देणार होते, त्याचा उल्लेख अर्थसंकल्पात झाला नाही. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेत ३ सिलिंडर मोफत देणार होते, त्याचाही कुठे उल्लेख दिसला नसल्याचा आरोपही शिंगणे यांनी केला आहे.
Users Today : 42