देऊळगाव मही:-तालुका प्रतिनिधी
सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने शासकीय रुग्णालय उपचारासाठी उपलब्ध करून दिली आहेत. मोठ्या प्रमाणात खर्च करून नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी शासन महिन्याकाठी रुग्णालयासाठी लाखों रुपये खर्च करते. मात्र, देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाचा कारभार हा पूर्णपणे ढेपाळला असून शासनाचे लाखों रुपये खर्च वाया जात असून त्या बदल्यात कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. याकडे वरिष्ठ अधिकारी यांच दुर्लक्ष होत आहे.देऊळगाव तालुक्यातील महत्वाचे देऊळगावमही येथील ग्रामीण रुग्णाल असून याठिकाणी परिसरातील ३० ते ३५ खेडेगावातील रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येतात. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय वापरासाठी शासनस्तरावर भारत सरकार विविध योजना राबवत असून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च करत आहे. परंतु, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना या ठिकाणी सोयी उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव उघड्यावरच बसावे लागते. यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी अनेक वेळा डॉक्टर रुग्णालयात उपचारासाठी हजर नसतात, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला आयुष विभातील कामे करणारे डॉक्टर व वर्ग ३ च्या कर्मचारी प्राथमिक उपचार करतात. रुग्णालय परिसरातZ सर्वत्र घाण पसरली असून हे ग्रामीण रुग्णालय आहे की जनावरांचा गोठा, असा प्रश्न या ठिकाणी आल्यावर सर्वसामान्य व्यक्तीला पडतो. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना तत्काळ सोयी सुविधा पुरवा अन्यथा ग्रामीण रुग्णालयाला टाळा ठोकू आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते किशोर शिंगणे यांनी दिला आहे.अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे सुविधांचा अभाव एकेकाळी परिसरात नावलौकिक मिळवलेले व आनंदीबाई जोशी सारखा महत्वाचा पुरस्कार मिळवलेले ग्रामीण रुग्णालय हे अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे रेफर टू बनले आहे. गेल्या वर्षभरात या ठिकाणी बोटावर मोजता येईल एवढ्या प्रसूती झाल्या असून अनेक कर्मचारी कर्मचारी दुपारच्या दुपार सत्रात फरार होतात, जाहिरातीवर एका बाजूला कोट्यवधी रुपये शासन खर्च करत असताना जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती स्वखर्चाने श्रमदानातून माध्यमातून शौचालय बांधत आहेत. मात्र, सर्व सुविधा उपलब्ध असताना केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उपलब्ध शौचालय वापराविना पडून असल्याचा धक्कादायक प्रकार रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना येत असून त्यांना उघड्यावर शौचास जावे लागते.
Users Today : 42