सैलानी:-विशेष प्रतिनिधी
होळीच्या पर्वावर सुरु झालेला सैलानी बाबांच्या यात्रेची आज २३ मार्च रोजी फातेहखानीने सांगता करण्यात आली. त्यावेळी यात्रा महोत्सव आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे.महाराष्ट्रासह देशाच्या काना कोपऱ्यातून लाखोच्या संख्येणे भाविक सैलानी बाबाच्या दर्शनाला येतात. होळीच्या पर्वावर सुरु होणारा हा यात्रामहोत्सव सुमारे दहा दिवस चालतो. यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येणे येणाऱ्या भाविकांसह विविध प्रकारच्या साहित्यांचे दुकाने देखील थाटण्यात येतात. सालाबादाप्रमाणे यंदाही होळीच्या सणापासून या यात्रामहोत्सवाला प्रारंभझाला होता. महाराष्ट्रासह देशाच्या काना-कोपऱ्यातून असंख्य भाविक यात्रेत दाखल झाले होते. भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने यात्रेदरम्यान सुयोग्य नियोजन करण्यात आले होते. सैलानी बाबा सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असल्याने यात्रेदरम्यान आठ ते दहा लाख भाविकांनी हजेरी लावली. मागील वर्षीपासून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना येत असल्याने यात्रेत असणारा उत्साह यंदा दिसून आला नाही. आज फातेहखानीने सैलानी यात्रेची सांगता करण्यात आली. सैलानी बाबाच्या समाधिवर सुगंधित अत्तर व चंदनाचा लेप लावून चादर चढविण्यात आली. मुजावर परिवारातर्फे महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेख शफिक मुजावर, शेख रफीक मुजावर, शेख महेबुब मुजावर, शेख हशम मुजावर, सोनु मुजावर, चाँद मुजावर, अस्लम मुजावर यासह रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत, राहूल जाधव, राजू गव्हाणे, शेख अख्तर, ओमप्रकाश सावळे, लक्ष्मण शिंदे, लिंबाजी राठोड, रामु रिंढे तसेच सैलानी ट्रस्टचे कर्मचारी उपस्थित होते.
Users Today : 42