मोताळा:-तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीक्षेत्र थड येथे अॅड. गणेशसिंग राजपूत यांच्या काँग्रेसच्या जुन्या सहाकार्यांनी आ. संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवित अॅड. गणेशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली २२ मार्च रोजी जवळपास ५० कार्यकर्त्यांनी शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे मोताळा तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे.
संत गजानन महाराज जन्मस्थळ श्रीक्षेत्र थड येथे आ. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. गणेशसिंग राजपूत यांच्या जुन्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश घेतला. यामध्ये कुञ्हा, गोतमारा, हनवतखेड, कोऱ्हाळा, खेडी पान्हेरा, किनोळा, ब्राम्हदा, खांडवा, धामणगाव बढे, सिंदखेड लपाली, रिधोरा, वाडी, पोफळी, पिंपळगाव देवी, महाळुंगी, वडगाव, दहिगाव, लिहा, उर्हा, चिंचपुर, माळेगाव, कोल्ही गवळी, गुगळी, कोल्ही गोलर, चावर्दा, धोनखेड, सारोळा मारुती, सारोळा पीर, फर्दापूर, वडगाव, रोहिणखेड, काळेगाव, तपोवन, पोखरी, उबाळखेड, सोन बरड, नळकुंड, नाईक नगर, डाभा, गुळभेली गावातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. आ. संजय गायकवाड यांनी त्यांचे शिवसेनेचा दुप्पटा देवून स्वागत केले. यावेळी बोलतांना आ. गायकवाड यांनी मुक्तारसिंग राजपूत हे धुरंधर नेते असून गोरगरीब कार्यकर्त्यांना मदत करीत अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहिले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, युवासेना नेते मृत्यूंजय गायकवाड, शिवसेना नेते विजय अंभोरे, शरद पाटील, भोजराज पाटील, सुभाषसिंग राजपूत, गणेश बस्सी यांच्यासह आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
Users Today : 42