सुलतानपूर:-तालुका प्रतिनिधी
डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेस सुलतानपूरचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी संजय लाहोटी यांचा वाढदिवस संस्थेच्या प्रांगणात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रारंभी वाढदिवसानिमित्त संजय लाहोटी यांना शुभेच्छा देण्यासाठी सुलतानपूर सह परिसरातील विविध पक्षातील नेते, सामाजिक कार्यकत्यांनी गर्दी केली होती. यावेळी मनोगत व्यक्त करताना संजय लाहोटी यांनी शिक्षण क्षेत्रातील आपल्या अनुभवांविषयी सांगत विद्याथ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कलेजेसतर्फे करण्यात आले होते. शेवटी उपस्थितांनी वाढदिवसानिमित्त केक कापून आणि फटाक्यांची आतषबाजी करून संजय लाहोटी यांचा वाढदिवस साजरा केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक इरतकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे सचिव सोमेश लाहोटी, कोषाध्यक्ष दिनेश नवगजे, प्राचार्य अतुल पडघान, प्राचार्य डॉ. नंद कायंदे, प्राचार्य डॉ. राजेश बाठारे, प्राचार्य शिवाजी सुरुशे, प्राचार्य डॉ. मीनल राऊत, प्राचार्य डॉ. किशोरी यादव, प्राचार्य भावना जाधव, प्राचार्य, डॉ. संजय अग्रवाल,मंगेश डावके, सागर जोशी व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Users Today : 42