दुसरबीड:-विशेष प्रतिनिधी
सिंदखेडराजा तालुक्यातील रेती घाटाचा शासनाकडून लिलाव झालेला नाही. त्यामुळे रेती उत्खननातील कमी कालावधीत अमाप पैसा मिळत असल्याने अनेक रेती तस्कर संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यातील या व्यवसायात उतरले आहेत. विशेष म्हणजे तढेगाव, हिवरखेड येथील रेती उत्खननाचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणावर सुरू असून ४ ब्रासचे १० टिप्पर व १० ते १५ ट्रॅक्टरने राजेरोसपणे उपसा करण्यात येत आहे. यासाठी पंढरपूर व तढेगाव येथील मालकीचे जेसीबीचा वापर करण्यात येत असल्याची माहिती आहे.एक टिप्पर भरून देताना ५ हजार रूपये तर ट्रॅक्टरसाठी १ हजार रुपये खडकपुर्णा नदीपात्रात उतरण्सयासाठी खाजगी रस्ता मालक घेत आहे. सर्वांची नजर खडकपुर्णा नदी काठावर असून दररोज रात्री व पहाटेपर्यंत अवैध रेती तस्करी ट्रॅक्टर व टिप्पर द्वारे होत आहे. संबंधित अधिकारी मात्र याकडे बघ्याची भूमिका घेत आहेत. सिंदखेडराजाचे तहसीलदार यांच्याविरोधात उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तालुक्यातून अनेक तक्रारी झालेल्या आहेत. याला कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण तर नाही ना?, असा प्रश्न तढेगाव, हिवरखेड येथील नागरिकांना पडला आहे.रेती तस्करी रोखण्यासाठी सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांनी बैठे पथकाची स्थापना केलेली असतांनाही दररोज दिवस-रात्र हजारो ब्रास रेती उपसा सुरू आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी नेमलेल्या बैठे पथकावरच शंका निर्माण होत आहे. शासनाचा करोडो रुपयांच्या महसूल बुडत असल्याचे जनतेत बोलले जात आहे. हिवरखेड, तढेगाव नदीपात्रातील रेतीही दर्जेदार व बांधकामासाठी उत्कृष्ट असल्यामुळे जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. यासह तालुक्यात मोठे बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे अमर्यादपणे रेतीचा अवैधपणे उपसा होत आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर रेती तस्करांकडून केला जात असून यात जेसीबी व ट्रॅक्टर किन्ही, सेक्नशनपंपच्या मदतीने नदीपात्रातील रेतीच्या उपसा करून मोठ-मोठ्या टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे शहराकडे व ग्रामीण भागात पाठविली जात आहेत.
Users Today : 42