सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील यशस्वी परतीचा विद्यार्थ्यांकडून आनंदोत्सव

Khozmaster
1 Min Read

सैलानी:-विशेष प्रतिनिधी

भारतीय वंशाच्या नासामधील वरिष्ठ अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या पृथ्वीवरील सुखरूप आगमनामुळे पिंपळगाव सराई येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स कॅप्सूल बुधवारी सकाळी गल्फ ऑफ मेक्सिको येथे सुखरूप उतरले. या ऐतिहासिक घटनेचा आनंद शाळेत विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. विद्यालयाचे कलाशिक्षक रवींद्र खानंदे यांनी सुनीता विल्यम्स यांच्या सन्मानार्थ सुंदर फलक लेखन आणि पोस्टर तयार केले. या कलाकृतींमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. या आनंदोत्सवात विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक भगवान आरसोडे, विज्ञान शिक्षक सुहास कुलकर्णी, देविदास दळवी, अविनाश असोलकर, ज्येष्ठ शिक्षक गजानन पाटोळे, वरिष्ठ लिपिक संजय गाडेकर आणि इतर सर्व शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. प्राचार्य प्रमोद ठोंबरे म्हणाले, सुनीता विल्यम्स यांचे सुरक्षित परतणे हे केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ संशोधनात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल. विज्ञान शिक्षक सुहास कुलकर्णी यांनी सुनीता विल्यम्स यांच्या अंतराळातील कार्याविषयी माहिती दिली. त्यांनी अंतराळात अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग केले, ज्यामुळे मानवाला अंतराळातील जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ संशोधनाविषयी आवड निर्माण झाली आहे

0 9 5 3 1 6
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *