देऊळगाव राजा:-तालुका प्रतिनिधी
स्थानिक समर्थ कृषी महाविद्यालय व भारतीय जैन संघटना (शाखा देऊळगाव राजा) यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात जागतिक जलदिवस उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन मेहेत्रे तर प्रमुख उपस्थितीत भारतीय जैन संघटनेचे राज्य कारकारिणी सदस्य सन्मती जैन, विदर्भसचीव मनीष कोठेकर, चॅप्टर अध्यक्ष पियुष खडकपूरकर, प्रा. सचिन सोळंकी, प्रा. किरण ठाकरे, प्राचार्य तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली. प्रास्ताविकातून प्रा. सचिन सोळंकी यांनी जलसंवर्धन व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. मनीष कोठेकर यांनी पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले. सन्मती जैन यांनी पाणीबचत विचारात नसून आचरनात सुद्धा आणली पाहिजे. भविष्यात जर आपल्या सर्वांना जल युद्धाचा सामना करावयाचा नसेल तर आतापासूनच सर्वांनी जल क्रांती अधिक प्रभावीपणे करून पावसाच्या पाण्याचा थेंब अन् थेंब जमिनीत जिरवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी पाण्याचे महत्व, पाण्याच्या समस्या तसेच भारतीय जैन संघटनेने राबवलेल्या पाणी वाचविण्याच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती सांगितली. सूत्रसंचालन ऋतुजा बनकर तर आभार ऋतुजा वाघ हीने मानले. यावेळी प्रा. चगदळे, प्रा. वानखेडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी पाणी बचतीची शपथ देण्यात आली.
Users Today : 42