करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अनिवार्य : डॉ. संजय उत्तरवार

Khozmaster
2 Min Read

मलकापूर:-तालुका प्रतिनिधी

सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय आणि त्या व्यावसायिक यशासाठी किती महत्त्वाच्या आहेत, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सॉफ्ट स्किल्स अनिवार्य असून संवाद कौशल्य संघटन क्षमता, जुळवून घेण्याची वृत्ती, निर्णयक्षमता, वेळेचे व्यवस्थापन आणि नेतृत्वगुण यांसारख्या सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व समजावून सांगत तुमच्या यशामध्ये तांत्रिक ज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकीच तुमच्या व्यक्तिमत्त्वातील कौशल्येही महत्त्वाची असतात. संवादकौशल्य, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्यासच तुम्ही स्पर्धात्मक जगात यशस्वी ठरू शकता, असे प्रतिपादन डॉ. संजय उत्तरवार यांनी केले. पद्मश्री डॉ.वि.भि. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘सॉफ्ट स्किल्सः यशस्वी करिअरसाठी महत्त्वाच्या कौशल्ये’ या विषयावर आयक्यूएसी अंतर्गत तृतीय व अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा पार पडली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यशाळेत तृतीय आणि अंतिम वर्षातील २१० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, आयक्यूसी प्रमुख प्रा.आर.एम.चौधरी, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रा.पी.व्ही. चोपडे उपस्थित होते. तसेच प्रा. संगीता खर्चे, डॉ. मंजरी करांडे, प्रा. मनीष आचेलिया, प्रा. अंकुश नारखेडे आणि प्रा. एस. एम. भोळे यांचाही सक्रिय सहभाग होता. प्राचार्य डॉ. खर्चे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तांत्रिक ज्ञानासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक कौशल्ये आणि नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन नियमितपणे करण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच प्रेरणा मिळाली, असे मत महाविद्यालयाचे अध्यक्ष डी. एन. पाटील उपाख्य नानासाहेब पाटील, खजिनदार सुधीर पाचपांडे यांनी व्यक्त केले.

0 9 5 3 1 6
Users Today : 42
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *