सोशल मीडियावरही सट्टेबाजीचे जाळे तरुणाई धोक्यात, पोलिसांचे दुर्लक्ष?

Khozmaster
2 Min Read

चिखली:-तालुका प्रतिनिधी 

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. मात्र, याच सोशल मीडियाचा वापर आता सट्टेबाजीच्या जाहिरातींसाठी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. एका ऑनलाइन बुकींग आणि वेगवेगळ्या नावाने सुरू असलेल्या या जाहिरातींमध्ये क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावण्याचे आमिष दाखवले जात आहे. सोशल मीडियावर येणाऱ्या या जाहिरातींमध्ये २४ तास सेवा, २४ तास पैसे काढण्याची सुविधा आणि २४ तास रिफिलची सुविधा असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, संपर्क करण्यासाठी मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या जाहिरातींमध्ये क्ढछ सामन्यांतील खेळाडूंचे फोटो वापरले जात आहेत. त्यामुळे तरुणाई या जाहिरातींकडे आकर्षित होत आहे. सरकारने सट्टेबाजीविरोधात कठोर कायदे करुन सोशल मीडियावरील सट्टेबाजीच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची गरज आहे. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम देखील राबविण्याची आवश्यक्ता असून नागरिकांनी देखील सट्टेबाजीविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. त्यांनी सोशल मीडियावर सट्टेबाजीच्या जाहिराती दिसल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी. तसेच, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सट्टेबाजीच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करावे. तरुणांनी अशा प्रकारच्या जाहिरातींना बळी पडू नये. सट्टेबाजीमुळे आर्थिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते. तसेच, पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून ते अशा जाहिरातींच्या जाळ्यात अडकणार नाहीत,पालकांची भूमिका पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या मुलांना सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन करावे. तसेच, सट्टेबाजीच्या दुष्परिणामांबद्दल त्यांना माहिती द्यावी.

0 9 5 3 2 4
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *