बुलढाणा जिल्ह्याला तीन शववाहीका मंजूर

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा:-जिल्हा प्रतिनिधी

व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हा अंतीमसंस्कारासाठी त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्याला तीन शववाहिका मिळल्या आहेत. या संदर्भात केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्या व्यक्तीला ग्रामीण भागात त्याच्या घरापर्यंत अंत्यविधीसाठी पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर शववाहिका असावी या दृष्टिकोनातून केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार राज्यामध्ये १३२ शववाहीका मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यातील ३ शववाहीका बुलढाणा जिल्ह्याला मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली या शववाहीका राहणार आहे. त्यातील एक शव वाहीका बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे राहणार आहे. त्या शववाहिकेचा उपयोग ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे.

0 9 5 3 2 4
Users Today : 50
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *